Monday, April 10, 2017

सोशल ब्रेकिंग न्यूज़ आणि होणार्‍या चुका

सोशल ब्रेकिंग न्यूज़ आणि होणार्‍या चुका:-


हल्ली जवळपास सगळ्याच प्रसार माध्यमांचे सोशल अकाउंट्स सुद्धा आहेत, जसे की ट्विटर फसेबुक इत्यादी.

आणि ह्या मार्फत येणाऱ्या  बातम्या ह्या नेटिझन्स काही वेळातच पसरवतात.

पण गेल्या काही दिवसात मात्र ह्यात कमालीच्या चुका दिसून येत आहेत.

दिली गेलेली बातमी किती खरी किती खोटी ह्याची शहानिशा न करता बातमी दिल्याची घटना काही दिवस आधी घडली.

त्या मध्ये पोलंड मध्ये भारतीय नागरिकावर हल्ला झाला आणि तो मृत पावला असे वृत्त दिले गेले, नंतर काहीच वेळात ते सुधारून तो हॉस्पिटल मधे उपचार घेत असल्याचे वृत्त आले.

बातमी च्या हेडिंग मध्ये एक तापमान आणि बातमीत वेगळेच तापमान दर्शवल्याची बातमी सुद्धा नजरेस पडली.

अशाच प्रकारे अगदी आजच एका अभिनेत्याच्या साखरपुडयाची बातमी एक शब्द चुकल्यामुळे टीकेला पात्र झाली. बातमी फोटोशॉप करून चुकीची पसरवली गेली अशी तक्रार सायबर सेल केली गेली. 

ह्या मुळे सोमोर आलेली बातमी जर आक्षेपार्ह वाटत असेल तर ती पुढे न पाठवणे हेच योग्य आहे. नेमकं काय चुकतय, ब्रेकिंग न्यूज द्यायची स्पर्धा, कि कोणी मुद्दामून एखाद्याची प्रतिमा ढासाळायचा प्रयत्न करण हे ह्या मागचं कारण ??
No comments:

Post a Comment