Tuesday, September 20, 2016

आता बिनधास्त ट्रिप वर जा गुगल ट्रिप्स सोबत :)


गुगल ने नुकत्याच आणलेल्या गुगल ट्रिप्स ह्या app ने तुम्ही तुमची ट्रिप स्वतःच आखू शकता. 

काय आहे गुगल ट्रिप्स मध्ये: 

१) तुम्ही जर विमानाची तिकिटे काढली असतील, हॉटेल आणि कार ह्यांचं बुकिंग केलं असेल आणि हे जर तुमच्या gmail अकाउंट मध्ये असतील तर हे ह्या app च्या Reservation टॅब मध्ये तुम्ही बघू शकता. 


                                                 


२) तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात त्या ठिकाणची प्रेक्षणीय स्थळं तुम्हाला, तुमच्या आवडी निवडी आणि तुमच्याकडे असलेला वेळ ह्यानुसार Day Plan टॅब मधील मॅप मध्ये दाखवलेली दिसतील. 


                                                 

३) ट्रिप मध्ये त्या ठिकाणचे स्थानिक खेळ, मैदानी आणि बैठे खेळ आणि मुलांसाठी असलेली ठिकाणे तुम्ही Things To Do ह्या टॅब मध्ये बघू शकता.

                                                  4) Food & Drink टॅब मध्ये जवळपास च्या हॉटेल्स आणि कॅफे ची लिस्ट तुम्हाला रेटिंग आणि reviews बरोबर बघायला मिळेल. 

                                                 ५) तुम्ही मार्क केलेली स्थळं जस कि एखादं हॉटेल किंवा कॅफे किंवा अगदी मित्राचं घर हे तुम्ही Saved Places टॅब मध्ये बघू शकता.  

गुगल ट्रिप मध्ये संबंधित ठिकाण डाउनलोड केल्यावर हि सर्व माहिती इंटरनेट शिवाय हि उपलब्ध होऊ शकते. 

ह्या app मुळे जर तुमच्या आधीच्या ट्रिप्स ची माहिती gmail वर असेल तर तुम्ही तुमच्या आधिच्या ट्रिप्स सुद्धा बघू शकता. 

आता ट्रिप ला जाताना गुगल ट्रिप ला नक्की बरोबर घेऊन जा. 

टेक क्नो कट्टा रेटिंग -- ४/५  

No comments:

Post a Comment