Monday, October 30, 2017

Whatsapp नवीन फिचर - लाईव्ह लोकेशन शेअरिंग

Whatsapp ह्या लोकप्रिय अँप्लिकेशन ने नुकतेच एक नवीन फिचर लाँच केले - लाईव्ह लोकेशन शेअरिंग

ह्या मध्ये लाईव्ह लोकेशन आपल्याला पाहिजे त्या व्यक्तीशी शेअर करता येऊ शकेल.  १५ मिनिटे, १ तास आणि ८ तास असे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत. 



कधी कधी आपल्याला एखाद्या ठिकाणी किंवा नातेवाईकांकडे जायचे असते पण पक्का पत्ता माहित नसतो अशा वेळी आपले लाईव्ह लोकेशन शेअर करून पुढे कसे यायचे आणि आपण बरोबर येतोय कि नाही ह्यासाठी ह्याची मदत होऊ शकते.


हि सुविधा म्हणजे अँप चा उत्तम वापर करून ती गरज पडल्यास आपल्या सुरक्षितेसाठी साठी सुद्धा वापरता येईल.




Sunday, October 8, 2017

iOS 11 - अपडेट

आयफोन वापरणारे फोन घेतल्यापासून दोन गोष्टींकडे आतुरतेने डोळे लावून बसलेले असतात, एक म्हणजे दार वर्षी नवीन नवीन येणारे फोन्स आणि दुसरी म्हणजे दर वर्षी उपलब्ध होणारी ऑपरेटिंग सिस्टिम.

नवीन फोन्स लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टिम बरोबरच उपलब्ध होतात, तर आधीच्या फोन्स ना हि as a अपडेट उपलब्ध होते. 

ह्या वर्षी मागच्याच महिन्यात अँपल ने ios ११ हि ऑपरेटिंग सिस्टिम आपल्या आयफोन ग्राहकांसाठी उपलब्ध केली, जाणून घेऊया ह्या नवीन ऑपरेटिंग सिस्टिम मधील काही महत्वाचे फीचर्स.  

१ ) कंट्रोल सेन्टर

आता कंट्रोल सेन्टर होम स्क्रीन वरून वरच्या बाजूला स्क्रोल करून सहज उघडता येते. ह्यात महत्वाचे म्हणजे ह्या मध्ये आपण आपल्या सोयीनुसार बदल करू शकतो, हा पर्याय सेटिंग्स मध्ये जाऊन कंट्रोल सेन्टर मध्ये Customise Controls ह्यात उपलब्ध आहे.






२) स्क्रीनशॉट 

स्क्रीनशॉट घेऊन तो सेव करण्यात तसे काही नवीन नाही असे तुम्हाला वाटत असेल, पण ios ११ मध्ये  स्क्रीनशॉट घेतल्या घेतल्या तो लगेच एडिट सुद्धा करता येतो, स्क्रीनशॉट घेतल्यावर तो स्क्रीन वर डाव्या बाजूच्या कोपऱ्यात खाली दिसतो, आणि तो ओपन करून सहज एडिट करता येतो.





३) स्क्रीन रेकॉर्डिंग 

हो. आता स्क्रीन रेकॉर्ड होऊ शकते, म्हणजे आता एखादा विडिओ कॉल सहज रेकॉर्ड करता येईल, हे सोपे जावे म्हणून स्क्रीन  रेकॉर्डिंग ऑप्शन कंट्रोल सेन्टर मध्ये घेऊ शकतो.



४) स्टोरेज :
बहुतेक फोन मध्ये स्टोरेज चा प्रॉब्लेम होतोच. अशा वेळी नेमक्या कशामुळे जागा भरली आहे हे आपण बघू शकतो सेटिंग मध्ये आयफोन स्टोअरेज मध्ये. ह्यात कोणत्या आप्लिकेशन ने किती व्यापली आहे ते दिसते, त्याच प्रमाणे जर imessage चा वापर जास्ती असेल आणि त्यातील ऍटॅचमेंट जास्ती जागा घेत असेल तर review large attachements मधून नको असलेल्या फाइल्स डावीकडे स्वाईप करून काढून टाकता येतील.










५) टाईप टू सिरी: 

आता तुम्ही सिरी बरोबर टाईप करून सुद्धा बोलू शकता, कधी कधी आपले उच्चार सिरी पर्यंत नीट पोचत नाहीत, किंवा आपल्याला गर्दीत सिरी ला काही विचारणे शक्य नसेल तेव्हा हा पर्याय अतिशय उपयोगी पडणारा आहे.



६) लाईव्ह फोटो: 

आयफोन ६S आणि त्या नंतरच्या फोन्स ने लाईव्ह फोटोज घेतल्यावर, फोटो ओपन करून वरती स्क्रोल करून, नवीन इफेक्ट्स बघता येतील. ह्या मध्ये, loop, bounce असे नवीन ऑप्शन्स आहेत. 

७) QR कोड: 

QR कोड आता ह्या ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये कुठलेही इतर ऍप्लिकेशन न  वापरता, फक्त कॅमेरा ओपन करून स्कॅन होऊ शकतो,  QR कोड स्कॅन केल्यावर वरती त्याचे डिटेल्स डिस्प्ले होतात.



८) स्कॅन डॉक्युमेंट्स: 

आता डॉक्युमेंट्स स्कॅन करायला सुद्धा दुसऱ्या अँप्लिकेशन्स ची गरज नाही. नोट्स अँप्लिकेशन ओपन केल्यावर नवीन नोट मध्ये डॉक्युमेंट्स स्कॅन पर्याय उपलब्ध आहे.





९) iMessage 
आता iMessage मध्ये येणाऱ्या messages साठी अलर्ट बंद करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. ह्या साठी त्या मेसेज वर जाऊन डाव्या बाजूला स्क्रोल केल्यावर hide alert हा पर्याय निवडावा लागेल.



१०) एका हाताने टाइपिंग :
हे एक अतिशय उपयुक्त आणि गरजेचे फिचर आहे, खास करून ज्यांच्या कडे प्लस साईझ चे फोन्स आहेत त्यांच्या साठी. ह्या मुळे तुमचा कीबोर्ड डाव्या किंवा उजव्या बाजूला तुम्ही घेऊ शकता आणि एक हात वापरून सहज टाईप करू शकता.

हा पर्यंत निवडण्यासाठी कीबोर्ड वर ईमोजी आयकॉन क्लिक करून हवा तो पर्याय निवडता येईल.










Monday, April 10, 2017

सोशल ब्रेकिंग न्यूज़ आणि होणार्‍या चुका

सोशल ब्रेकिंग न्यूज़ आणि होणार्‍या चुका:-


हल्ली जवळपास सगळ्याच प्रसार माध्यमांचे सोशल अकाउंट्स सुद्धा आहेत, जसे की ट्विटर फसेबुक इत्यादी.

आणि ह्या मार्फत येणाऱ्या  बातम्या ह्या नेटिझन्स काही वेळातच पसरवतात.

पण गेल्या काही दिवसात मात्र ह्यात कमालीच्या चुका दिसून येत आहेत.

दिली गेलेली बातमी किती खरी किती खोटी ह्याची शहानिशा न करता बातमी दिल्याची घटना काही दिवस आधी घडली.

त्या मध्ये पोलंड मध्ये भारतीय नागरिकावर हल्ला झाला आणि तो मृत पावला असे वृत्त दिले गेले, नंतर काहीच वेळात ते सुधारून तो हॉस्पिटल मधे उपचार घेत असल्याचे वृत्त आले.

बातमी च्या हेडिंग मध्ये एक तापमान आणि बातमीत वेगळेच तापमान दर्शवल्याची बातमी सुद्धा नजरेस पडली.

अशाच प्रकारे अगदी आजच एका अभिनेत्याच्या साखरपुडयाची बातमी एक शब्द चुकल्यामुळे टीकेला पात्र झाली. बातमी फोटोशॉप करून चुकीची पसरवली गेली अशी तक्रार सायबर सेल केली गेली. 

ह्या मुळे सोमोर आलेली बातमी जर आक्षेपार्ह वाटत असेल तर ती पुढे न पाठवणे हेच योग्य आहे. 



नेमकं काय चुकतय, ब्रेकिंग न्यूज द्यायची स्पर्धा, कि कोणी मुद्दामून एखाद्याची प्रतिमा ढासाळायचा प्रयत्न करण हे ह्या मागचं कारण ??




Tuesday, September 20, 2016

आता बिनधास्त ट्रिप वर जा गुगल ट्रिप्स सोबत :)


गुगल ने नुकत्याच आणलेल्या गुगल ट्रिप्स ह्या app ने तुम्ही तुमची ट्रिप स्वतःच आखू शकता. 

काय आहे गुगल ट्रिप्स मध्ये: 

१) तुम्ही जर विमानाची तिकिटे काढली असतील, हॉटेल आणि कार ह्यांचं बुकिंग केलं असेल आणि हे जर तुमच्या gmail अकाउंट मध्ये असतील तर हे ह्या app च्या Reservation टॅब मध्ये तुम्ही बघू शकता. 


                                                 


२) तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात त्या ठिकाणची प्रेक्षणीय स्थळं तुम्हाला, तुमच्या आवडी निवडी आणि तुमच्याकडे असलेला वेळ ह्यानुसार Day Plan टॅब मधील मॅप मध्ये दाखवलेली दिसतील. 


                                                 

३) ट्रिप मध्ये त्या ठिकाणचे स्थानिक खेळ, मैदानी आणि बैठे खेळ आणि मुलांसाठी असलेली ठिकाणे तुम्ही Things To Do ह्या टॅब मध्ये बघू शकता.

                                                  



4) Food & Drink टॅब मध्ये जवळपास च्या हॉटेल्स आणि कॅफे ची लिस्ट तुम्हाला रेटिंग आणि reviews बरोबर बघायला मिळेल. 

                                                 



५) तुम्ही मार्क केलेली स्थळं जस कि एखादं हॉटेल किंवा कॅफे किंवा अगदी मित्राचं घर हे तुम्ही Saved Places टॅब मध्ये बघू शकता.  

गुगल ट्रिप मध्ये संबंधित ठिकाण डाउनलोड केल्यावर हि सर्व माहिती इंटरनेट शिवाय हि उपलब्ध होऊ शकते. 

ह्या app मुळे जर तुमच्या आधीच्या ट्रिप्स ची माहिती gmail वर असेल तर तुम्ही तुमच्या आधिच्या ट्रिप्स सुद्धा बघू शकता. 

आता ट्रिप ला जाताना गुगल ट्रिप ला नक्की बरोबर घेऊन जा. 

टेक क्नो कट्टा रेटिंग -- ४/५  

Monday, September 19, 2016

गुगल च Allo app Whatsapp ला टक्कर देणार ? 



Whatsapp हे सध्या जगभरात वापरल्या जाणाऱ्या messaging apps पैकी सगळ्यात अग्रस्थानी आहे आणि गुगल ची आधीची applications गुगल टॉक आणि नंतर हॅन्गआऊट ह्या नंतर गुगल ने नुकतच Duo हे विडिओ कॉलिंग अँप सुरु केलं आणि ते काही कालावधीतच लोकांना आवडूही लागलं आणि आता गुगल Allo हे messaging app ह्या आठवड्यात उपलब्ध करणार असल्याची बातमी आहे. 

ह्या मध्ये असलेली काही विशेष features :




                                          १) टाईप न करता pre-defined स्मार्ट रिप्लाय





२) फोटोज वर टेक्स्ट 



३) विविध टेक्स्ट फॉरमॅट्स




                                                                       ४) Exclusive स्टिकर्स 



५) प्रायव्हेट चॅट  




गुगल च Allo Whatsa pp ला टक्कर देण्यात किती प्रमाणात यशस्वी होईल ह्या साठी थोडा वेळ धीर धरावा लागणार आहे.